*💫कणकवली दि.१०-;* देशात सध्या महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यांना रोखण्यासाठी व वाहनचालकामध्ये जनजागृती करण्यासाठी महामार्ग मृत्यूनजय दूत सिंधुदुर्ग व रत्नागिरी यांच्या वतीने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील खारेपाटण येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.व शिस्तीचे व नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचलकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,महामार्ग पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग अरुण जाधव,पोलीस हेड कॉन्स्टेबल वेंगुर्लेकर,महामार्ग पोलीस श्री. बुचडे,श्री चिंदरकर,श्री करवंजे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार देशात होणारे अपघात रोखण्यासाठी व नागरिकांमध्ये मोटार वाहन कायद्याचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टीने अप्पर पोलीस महा संचालक उपाध्याय साहेब,रायगड जिल्हा परिक्षेत्राचे महामार्ग पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान,सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,महामार्ग पोलीस उपविभागीय अधीकारी श्री. बागडीकर,महामार्ग पोलीस निरीक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे.व चालकामध्ये महामार्गावरून व राज्यमार्गावरून जाताना नियमांचे पालन व्हावे.याकरिता हा प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला असल्याचे महामार्ग पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी यावेळी सांगितले. खारेपाटण महामार्गावर सम्पन्न झालेल्या या कार्यक्रमात सीटबेल्ट व हल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकांना गुलाब फुल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.या बरोबरच हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकांचे महामार्ग पोलिसांनी प्रबोधन करून हेल्मेट वापरन्यासाठी पुष्पगुच्छ देण्यात आला.कोरोनाच्या महामारी पेक्षाही किती तरी पटीने देशातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले असून सुमारे ३५० नागरिक अपघातात तासाला जायबंदी होत आहे. देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब असल्याचे यावेळी महामार्ग पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी वाहनचालकाना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी उपस्थित वाहनचालकांच्या हातात प्रबोधनात्मक फलक व तक्ते देण्यात आले होते.यामध्ये “हेल्मेटचा वापर करा., वाहन चालवताना मोबाइलवरून संभाषण करू नका,सिटबेल्टचा वापर करा,वेग कमी जीवनाची हमी,रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्या.वाहन चालवताना संभाषण करू नका. अशा प्रबोधनात्मक घोषणा लिहिलेल्या होत्या.
अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहनचालकांना खारेपाटण येथे जनजागृती
