देवगडात लोकमतच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी अयोध्याप्रसाद गांवकर यांचे यशस्वी आयोजन

*💫देवगड दि.१०-:* येथे उमाबाई बर्वे लायब्ररीमध्ये दैनिक लोकमत तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देवगड तालुका रक्तदान शिबिराची जबाबदारी लोकमतचे प्रतिनिधी अयोध्याप्रसाद गावकर यांच्याकडे देण्यात आली होती. ही जबाबदारी चोखपणे बजावून रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले आहे. या रक्तदान शिबिराला उत्फुर्तपणे रक्तदात्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. या रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी देवगड-जामसंडे नगराध्यक्षा प्रियांका साळसकर,तालुका वैदयकिय अधिकारी डॉ.संतोष कोंडके,जिल्हा आरोग्य विभागाचे वैदयकिय अधिकारी व कर्मचारी ,उदयोजक नंदुशेठ घाटे.तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर,किरण टेंबुलकर,गौरव पारकर,दयानंद पाटील,रुपेश खोत,अभय कुलकर्णी ,नगरसेवक उमेश कणेरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page