जावेद पाटणकर, जितेंद्र तळेकर, ज्ञानेश्वर फोंडके, गौस पाटणकर, प्रथमेश तळेकर यांना संधी
वैभववाडी प्रतिनिधी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना वैभववाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या . यामध्ये जावेद पाटणकर यांची अल्पसंख्याक शिवसेना तालुका प्रमुख जितेंद्र तळेकर यांची विभाग प्रमुख (कोळपे जि. प,ज्ञानेश्वर फोंडके यांची उपविभाग प्रमुख (भुईबावडा पंचायत समिती), गौस पाटणकर यांची उपविभाग प्रमुख (उंबर्डे प स ),प्रथमेश तळेकर – शाखा प्रमुख तिरवडे तर्फे खारेपाटण पदी निवड करण्यात आली. यावेळी उंबर्डे मेहबूब नगर येथे शिवसेनेची शाखेचे उद्घाटन करण्यात आले. उंबर्डे मेहबूबनगर शाखाप्रमुख – अमीन बक्षा लांजेकर उप शाखा प्रमुख -शहाबुद्दीन कासीम बोबडे, बुथ प्रमुख – इम्रान दाऊद पाटणकर गट प्रमुख – मुराद अकबर रमदुल यांची निवड करण्यात आली. *यावेळी खासदार श्री. विनायक राऊत यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे , सचिन सावंत, नंदू शिंदे, मंगेश लोके, दिगंबर पाटील , संदेश पटेल,स्वप्नील धुरी,प्रदीप रावराणे, रवींद्र रावराणे, संतोष पवार,मनोज सावंत,अतुल सरवटे, विठोबा गुरव, रोहित रावराणे, बंड्या होळकर, संतोष बोडके आदी पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
