वैभववाडी प्रतिनिधी तालुक्यात आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या तहसिलदार रामदास झळके, पोलिस निरिक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी धर्मे यांचा कोविड योद्धा म्हणून वैभववाडी शिवसेनेच्या वतीने सन्मान खा राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. बळीराजा आत्मसन्मान योजनेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार विनायक राऊत वैभववाडी येथे आले होते. वैभववाडी तालुक्यातील कोरोनाची गेल्या काही महिन्यांतील स्थिती लक्षात घेता तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावं कंन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केली होती. काही गावांची रूग्ण संख्या शतक पार करून पुढे गेली होती. त्यामुळे वैभववाडी बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांवर अंकुश ठेवणे, करुळ भुईबावडा घाटमार्गे जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे, शंकास्पद नागरिकांची रॅपिड टेस्ट करणे, कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना कोव्हिड सेंटर येथे दाखल करून घेणे, तालुक्यासह ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करणे, घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करणे यांसारख्या अनेक गोष्टी स्थानिक प्रशासनाकडून काळजीपूर्वक राबविण्यात आल्याने वैभववाडी तालुक्यातील कोरोनाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत खुप कमी आहे. तालुक्यातील एकंदरीत या सर्व परिस्थितीवर नियंत्रण व लक्ष ठेवणाऱ्या आरोग्य व पोलीस प्रशासनाचे खासदार विनायक राऊत यांनी कौतुक केले. तसेच तहसिलदार रामदास झळके, पोलिस निरिक्षक अतुल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सयाजी धर्मे यांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील कोरोनाची सर्व परिस्थिती व आढावा सकारात्मक दृष्टिकोनातून वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचवणे व कोरोना काळात तालुकावासियांच्या समस्या, शंका स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणाऱ्या सर्व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींचा देखील शाल व काजूचे झाड देऊन सत्कार करण्यात आला. तालुक्यातील सर्व नागरिक व स्थानिक प्रशासन या सर्वांनी एकमेकांना सहकार्य करुन तालुक्यातील कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन यावेळी खासदार विनायक राऊत यांनी केले. यावेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, संदेश पारकर, अतुल रावराणे, जिल्हा प्रमुख संजय पडते, तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, कणकवली विधानसभा संघटक सचिन सावंत, तालुकप्रमुख मंगेश लोके, प्रदिप रावराणे, जि. प. माजी सभापती संदेश पटेल, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, नगरसेवक संतोष पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, डॉ. सयाजी धर्मे, तालुका संघटक अशोक रावराणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, लोरे नं. १ चे माजी सरपंच राजू रावराणे, अंबाजी हुंबे, गितेश कडू, अतुल सरवटे, नंदु शिंदे यांसह तालुक्यातील सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कोरोना योध्याचा खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते सत्कार
