Headlines

Global Maharashtra Breaking News

शेर्ले व आजूबाजूच्या गावातील कुटुंबांसाठी नाथ पै सेवांगण कट्टा येथे मदत जमा करण्याचे आवाहन

*💫मालवण दि.२५-:* जिल्ह्यातील बांदा नजिकच्या शेर्ले व आजूबाजूच्या गावामध्ये पुरामुळे शंभर ते सव्वाशे घरे पाण्याखाली गेली होती. त्या सर्व सव्वाशे कुटुंबांच्या मदतीसाठी चटई,बेडशीट,सुके खाणे, मीठ,साबण,माचिस,मेणबत्ती,टूथपेस्ट,मच्छर अगरबत्ती,कांदे,बटाटे,पाणी बॉटल, क्रॉसिन टॅबलेट तसेच फळ भाजी इ. सामान त्या गावांमध्ये पोच करायचे आहे. ज्या दात्याना सदर साहित्य ध्यायचे असेल त्यांनी नाथ पैं सेवांगण शाखा कट्टा येथे शक्य होईल त्याप्रमाणे…

Read Full News

माजी विद्यार्थ्यांनी ओझर विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका उषा मुरवणे यांचा केला सत्कार

*💫मालवण दि.२५-:* कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती. उषा दत्तात्रय मुरवणे यांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माजी विद्यार्थी उमेश कोदे यांनी मुरवणे यांच्या शैक्षणिक जीवन कार्याची माहिती देणारा ‘गुरुवरा हृदयेश्वर तू खरा’ हा लिहिलेला लेख श्रीमती. मुरवणे यांना देण्यात आला. यावेळी विजय नातू, प्रशांत पारकर,…

Read Full News

हानी झालेले वादळग्रस्त लाभापासून वंचित

तर काहींना हानीपेक्षा अधिक मोबदला;तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद:अरविंद मोडकर व अमृत राऊळ यांचा आरोप *💫मालवण दि.२५-:* मालवण तालुक्यातील तौक्ते वादळग्रस्तांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करताच चुकीचा अहवाल दिल्याने प्रत्यक्षात मोठी हानी झालेले वादळग्रस्त या लाभापासून वंचित आहेत. तर काहींना हानीपेक्षा अधिक मोबदला दिला जात आहे….

Read Full News

भुईबांवडा पहिलीवाडीतील शेवरीचा कापाट येथील अर्धा डोंगर खचला

सुदैवाने जीवीत हानी नाही झाडे पडल्याने लाखोंचे नुकसान *💫वैभववाडी दि२५-:* कोकणात गेल्या आठ दिवसापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी मध्यराञी भुईबावडा येथे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग खचून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.वस्तीपासून डोंगर लांब असल्यामुळे सुदैवाने जिवीतहानी…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १२रुग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा या भागात एक रुग्ण सापडला असून ग्रामीण भागात तळवडे २, माजगाव ३, मळगाव ४, कोलगाव १, कवठणी १ असे रुग्ण…

Read Full News

“मल्हारी’ पूलाच्या ठिकाणी साकव करून तात्पुरत्या स्वरूपात रहदारी सुरू करणार

आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकारातून निघाला मार्ग *💫कणकवली दि२५-:* कणकवली तालुक्यातील कनेडी – नाटळ मार्ग जोडणारे मल्हारी पूल कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सोबत घेत आम.वैभव नाईक यांनी कोसळलेल्या पुलाची पाहणी केली. व तात्काळ उपाययोजना म्हणून या कोसळलेल्या पूलाच्या ठिकाणी साकव करून तात्पुरत्या स्वरूपात मोटारसायकल व चालत जाणाऱ्या लोकांची रहदारी सुरू होण्याच्या दृष्टीने कार्यवाहीच्या…

Read Full News

कुडाळ येथे इंधन दरवाढी विरोधात जिल्हा काँग्रेसचे आंदोलन…

केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी;जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत गावडे व महिला अध्यक्षा साक्षी समीर वंजारी यांचा आंदोलनात सहभाग कुडाळ : इंधन दरवाढी विरोधात आज शहरात जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘बैलगाडी-सायकल मोर्चा” आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या खांद्याला खांदा लावून सिंधदुर्ग महिला काँग्रेस…

Read Full News

पुराचे पाणी विहिरीत गेल्याने बांदा येथे पिण्याच्या पाण्याचे झाले हाल

कॉग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी पाणी केले उपलब्ध *💫बांदा दि.२५-:*   तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा येथे दोन दिवसांपूर्वी पूर आला होता. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले होते. पुराचे पाणी विहिरीत गेल्याने तेथील लोकांचे पिण्याच्या पाण्याचे देखील हाल होत आहेत. यावेळी आज कॉग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी त्या गावात जाऊन पिण्याचे पाणी उपलब्ध…

Read Full News

तेर्सेबांबर्डे येथील नुकसानग्रस्तांची त्रयस्थ कर्मचाऱ्यांमार्फत फेर चौकशी करावी…

तेर्सेबांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांची मागणी_ *💫कुडाळ ता.२५-:* तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त मालमत्तांची त्रयस्थ कर्मचाऱ्यांमार्फत फेर चौकशी करून सत्यता पडताळणी केल्याशिवाय तेर्सेबांबर्डे येथील त्या अकरा नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत अदा करू नये, अशी मागणी तेर्सेबांबर्डे माजी सरपंच भास्कर परब यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली आहे. या विषयी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचे…

Read Full News

बावशी रेशनिंग प्रकरणी उद्यापासून आमरण उपोषण

कणकवली 25 जुलै (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ दिल्यास व मुदतवाढ देणार नाही असे लेखी स्वरूपात आश्वासन न दिल्याने नियोजित २६ जुलै रोजीचे ग्रा‌.पं.येथे होणारे आमरण उपोषण होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या बावशी रेशनिंग दुकान प्रस्ताव प्रकरण राजकारण चांगलेच तापणार असल्याचे…

Read Full News

You cannot copy content of this page