कॉग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी पाणी केले उपलब्ध
*💫बांदा दि.२५-:* तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा येथे दोन दिवसांपूर्वी पूर आला होता. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले होते. पुराचे पाणी विहिरीत गेल्याने तेथील लोकांचे पिण्याच्या पाण्याचे देखील हाल होत आहेत. यावेळी आज कॉग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी त्या गावात जाऊन पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.
यावेळी त्यांनी या महापुरात उध्वस्त झालेल्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले आहे.
यावेळी सावंतवाडी महिला तालुका अध्यक्षा स्मिता वागळे, कुडाळ तालुकाध्यक्ष सुंदर वल्ली पड्यायचे, अँड. निता गावडे, शहर अध्यक्ष राजेश गोवेकर, सावंतवाडी व बांदा काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. गोविंद कुंभार (युवा काँग्रेस कुडाळ ) सरचिटणीस अन्वर खान, बांदा आदी उपस्थित होते
