केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी;जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत गावडे व महिला अध्यक्षा साक्षी समीर वंजारी यांचा आंदोलनात सहभाग
कुडाळ : इंधन दरवाढी विरोधात आज शहरात जिल्हा काँग्रेसच्यावतीने ‘बैलगाडी-सायकल मोर्चा” आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या खांद्याला खांदा लावून सिंधदुर्ग महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी समीर वंजारी यांच्या समवेत शेकडो महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या येथील आंबेडकर चौकातून जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी हा मोर्चा रोखत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात सावंतवाडी तालुकाध्यक्ष स्मिता वागळे, कुडाळ तालुका अध्यक्ष सुंदर वल्ली, अमिदी मेस्त्री, अॅड. नीता गावडे, जिल्हा प्रतिनिधी सुगंधा साटम, सावंतवाडी विधानसभा मिडीया अध्यक्ष जास्मिन लंकेश्वर, तसेच तालुका कार्यकारिणीतले सदस्य, तालुका उपाध्यक्ष, महिला कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात या वाढत्या महागाईला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.
