बावशी रेशनिंग प्रकरणी उद्यापासून आमरण उपोषण

कणकवली 25 जुलै (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यातील बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ दिल्यास व मुदतवाढ देणार नाही असे लेखी स्वरूपात आश्वासन न दिल्याने नियोजित २६ जुलै रोजीचे ग्रा‌.पं.येथे होणारे आमरण उपोषण होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या बावशी रेशनिंग दुकान प्रस्ताव प्रकरण राजकारण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे ‌.पहीले मल्हार बचत गटाचे उपोषण नंतर बावशी काही वाडीतील पुकारलेले उद्याचे उपोषण पाहता येथे रेशनिंग दुकान प्रस्ताव प्रकरणावरुन राजकीय रंग चढला जात असल्याचे चर्चिले जात आहे . बावशी गावाला स्वतंत्र मिळणारे रेशनिंग दुकानसाठी गेल्या वर्षी प्रस्ताव बावशी येथील जय मल्हार महीला बचत गटने पुरवठा विभाग यांच्या जवळ सुपूर्द करण्यात आला होता. मात्र कोरोना काळात पत्रव्यवहार करून सदर गटाने संपर्क न केल्याने कालांतराने त्यांनी प्रस्ताव रद्द केला होता यामुळे सदर बचत गटाने पुरवठा विभाग यांच्या विरोधात आमरण उपोषणाला केले होते. यानंतर नायब तहसीलदार सुजाता पाटील यांनी भेट देऊन पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले होते. परंतु सदर रेशनिंग दुकान आहे त्याच ठिकाणी चालू रहावे अशी बावशी शेळीची वाडी , गावठण, बौद्धवाडी या सर्वांची मागणी असून सदर गटाला मुदतवाढ देण्यात येवू नये ‌आणि तशी आम्हाला लेखी स्वरूपात देण्यात यावे की, आम्ही मुदतवाढ देणार नाही व तसंच चालू राहील .असे न दिल्यास आम्ही ग्रामस्थ २६ जुलै रोजी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नांदगाव वि.वि. कार्यकारी सहकारी सोसायटी च्या माध्यमातून तोंडवली बावशी फाटा येथे सुरू झाले आहे आणि हे सर्वांना सोईचे आहे जर येथील हलविण्याचा प्रयत्न केला तर २६ जुलै रोजी आम्ही रेशनिंग कार्ड धारक आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदन पालकमंत्री व प्रांताधिकारी यांचेकडे सादर केले होते.

You cannot copy content of this page