*💫मालवण दि.२५-:* जिल्ह्यातील बांदा नजिकच्या शेर्ले व आजूबाजूच्या गावामध्ये पुरामुळे शंभर ते सव्वाशे घरे पाण्याखाली गेली होती. त्या सर्व सव्वाशे कुटुंबांच्या मदतीसाठी चटई,बेडशीट,सुके खाणे, मीठ,साबण,माचिस,मेणबत्ती,टूथपेस्ट,मच्छर अगरबत्ती,कांदे,बटाटे,पाणी बॉटल, क्रॉसिन टॅबलेट तसेच फळ भाजी इ. सामान त्या गावांमध्ये पोच करायचे आहे. ज्या दात्याना सदर साहित्य ध्यायचे असेल त्यांनी नाथ पैं सेवांगण शाखा कट्टा येथे शक्य होईल त्याप्रमाणे मदत करण्याचे आवाहन नाथ पै सेवांगण शाखा कट्टाच्या वतीने करण्यात आले आहे. सदर मदत २५ जुलै पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणून द्यावी. सोमवार २६ रोजी सकाळी हे सामान बांदा येथे पोहोचवण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह शाम पावसकर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी नाथ पैं सेवांगण , शाखा कट्टा येथे (9423833163/ 9423512438, 8275650831) या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेर्ले व आजूबाजूच्या गावातील कुटुंबांसाठी नाथ पै सेवांगण कट्टा येथे मदत जमा करण्याचे आवाहन
