माजी विद्यार्थ्यांनी ओझर विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका उषा मुरवणे यांचा केला सत्कार

*💫मालवण दि.२५-:* कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती. उषा दत्तात्रय मुरवणे यांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवासस्थानी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी माजी विद्यार्थी उमेश कोदे यांनी मुरवणे यांच्या शैक्षणिक जीवन कार्याची माहिती देणारा ‘गुरुवरा हृदयेश्वर तू खरा’ हा लिहिलेला लेख श्रीमती. मुरवणे यांना देण्यात आला. यावेळी विजय नातू, प्रशांत पारकर, अर्जना कोदे, किशोर नरे, उमेश कोदे तसेच ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. खोत यांनी मुरवणे यांच्या शिकवणीच्या जुन्या शालेय आठवणी जाग्या केल्या. यावर्षी दहावी परीक्षेत पाचशे गुण मिळवून मालवण तालुक्यात प्रथम आलेला मुरवणे यांचा नातू मिलिंद मुरवणे याचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रशांत पारकर यांनी केले तर आभार उमेश कोदे यांनी मानले. यावेळी डॉ. उज्वल मुरवणे, सौ. स्नेहलता कांबळी-वराडकर, किशोर नरे, सूर्यकांत मांजरेकर, धनाजी चोडणेकर, नंदकुमार पाटील, विराणी कोदे, सौ. विशाखा नातू-वझे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page