Headlines

Global Maharashtra Breaking News

ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांना ग्लास फेसशील्ड व किट वाटप

उद्योजक सागर वाडकर व बांधकाम सभापती मंदार केणी यांचा पुढाकार मालवण दि प्रतिनिधी मालवणचे उद्योजक सागर वाडकर व मालवण नगर पालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर येथील डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांना ग्लास फेसशिल्ड व कोविड किट सुपूर्द करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, नर्स व आरोग्य…

Read Full News

घरावर धाड टाकत अवैध दारूसाठा जप्त

सावंतवाडी सालईवाडा येथे कुडाळ एक्साईजची कारवाई *⚡सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी सालईवाडा येथे एका घरावर आज धाड टाकत अवैध दारूचा साठा पकडण्यात आला. याप्रकरणी एकावर कुडाळ एक्साईज् विभागाने कारवाई केली आहे. सावंतवाडी सालईवाडा येथे एका घरात अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कुडाळ एक्साईज् यांना मिळाली होती. त्यानुसार आज धाड टाकत अवैध दारू पकडण्यात आली आहे,

Read Full News

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने अतिवृष्टीग्रस्ताना आवश्यक साहित्य वाटप

एक महिना पुरेल एवढे धान्य, कपडे पुरविले *⚡सावंतवाडी ता.०२-:* अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद नेहमी सामाजिक भावनेतून काम करत आहे पत्रकारांच्या समस्या अडचणी सोडवण्या बरोबर समाजातील विविध समस्या व अडचणी मार्गी लावण्याच्या दृष्टीने ही नेहमी कार्य करीत आली आहे गेल्या बावीस जुलैला झालेल्या कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड भागातील पूर परिस्थिती अनेकांचे संसार कुटुंब व्यापार पूर्णपणे…

Read Full News

मनोज सोनवणे यांनी माणुसकी धर्म पाळला

कणकवली तहसीलदार रमेश पवार यांचे ओसरगाव येथे प्रतिपादन *⚡कणकवली ता.०२-:* जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसारसाहित्य होत्याचे नव्हते झाले. सिंधुदुर्गातही अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या हातावर पोट असणाऱ्या गरजवंतांना अन्नधान्य देऊन सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांनी माणुसकीचा धर्म पाळला असल्याचे गौरवोद्गार कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी काढले. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांच्यावतीने जुलै महिन्यात झालेल्या प्रलयकारी…

Read Full News

भारतीय बौद्ध महासभा गावशाखा फोंडघाटतर्फे दहावी विद्यर्थ्यांचा सत्कार

*⚡कणकवली ता.०२-:* कोरोनाच्या कठीण काळात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये माध्यमिक शाळांत परीक्षा इयता १० वी उत्तीर्ण झालेल्या बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ वर्षावास निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा गावंशाखा फोंडाघाट यांच्यावतीने “नालंदा बुद्धविहार ” फोडाघाट येथे झाला. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा बौद्धचार्य तसेच जेष्ठ विचारवंत जनीकुमार कांबळे यांच्याहस्ते दहावी परीक्षेत उत्तीर्ण…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १०४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४४ हजार ४२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ५३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १०४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

गाळेल दुर्घटनेत मृत झालेल्या गीतेश गावडेला शासकीय मदत मिळावी

बांदा सरपंच अक्रम खान यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.०२-:* गाळेल येथील दुर्घनेत मृत्यू पावलेल्या गीतेश गावडे या युवकाच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सरपंच अक्रम खान यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले गीतेश हा कर्ता पुरुष होता मात्र त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने…

Read Full News

ग्रामीण पेक्षा मालवण शहराला ५०० डोस जास्त द्या

नगराध्यक्ष कांदळगांवकर यांची सीईओ नायर यांच्याकडे मागणी *⚡मालवण ता.०२-:* मालवण शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत प्रचंड गोंधळ उडत असल्याने यातून वादाचे प्रसंग उद्भवत असून जनतेतून याचा रोष लोकप्रतिनिधींवर येत आहे. त्यामुळे मालवणात शहरातील लसीकरणाचे योग्य नियोजन करावे तसेच ग्रामीण भागापेक्षा मालवण शहराला दिवसाकाठी किमान ५०० डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी…

Read Full News

महिला सबलीकरणासाठी सावंतवाडी रोटरी क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

अध्यक्ष रो. साईप्रसाद हवालदार यांची संकल्पना *⚡सावंतवाडी दि.०२-:* रोटरीने यावर्षी “महिला सबलीकरणा” वर विशेष भर देऊन त्यांना आणखी सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातुन या वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार यांनी एक नवी कल्पना मांडली. नेमके या महिलांच्या नजरेतुन कशा प्रकारे त्या सक्षम होऊ इच्छितात हे समजुन घेण्यासाठी एक…

Read Full News

लोकमान्य टिळक पुण्यतिथी, बॅ.बाळासाहेब खर्डेकर व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य बॅ.बाळासाहेब खर्डेकर जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असे कार्यक्रम संपन्न झाले. या सर्वांच्या प्रतिमेस प्रा.बी.एम.भैरट, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, प्रा.पी.जी.देसाई, प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, सांस्कृतिक समितीचे प्रा.वामन गावडे, प्रा.देविदास आरोलकर, प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा.आर.बी.सूर्यवंशी, प्रा.सदशिव चुकेवाड, प्रा.विरेंद्र देसाई,…

Read Full News

You cannot copy content of this page