भारतीय बौद्ध महासभा गावशाखा फोंडघाटतर्फे दहावी विद्यर्थ्यांचा सत्कार

*⚡कणकवली ता.०२-:* कोरोनाच्या कठीण काळात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये माध्यमिक शाळांत परीक्षा इयता १० वी उत्तीर्ण झालेल्या बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ वर्षावास निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा गावंशाखा फोंडाघाट यांच्यावतीने “नालंदा बुद्धविहार ” फोडाघाट येथे झाला. भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा बौद्धचार्य तसेच जेष्ठ विचारवंत जनीकुमार कांबळे यांच्याहस्ते दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यर्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व विदयार्थ्यांना भ.गौत्तम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र ग्रंथ तसेच अंधश्रद्धा व विपश्यना ही पुस्तके भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तर न्यू इंग्लिश स्कुल फोडाघाट या विद्यालयातून १० वी उत्तीर्ण झालेल्या पियुष मिलिंद जाधव(८३ % गुण ),यशदिप जयवंत जाधव (७२ % गुण ),कु.दीक्षा आनंद जाधव (७० % गुण ),दीक्षांत दीपक जाधव (५७ % गुण ) या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. डॉ.बाबासाहेब त्याकाळी प्रथम दहावी उत्तीर्ण झाल्या नंतर वडील रामजी बाबा यांच्या परिचयाच्या लोकांनी परळ मुंबई येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याच वेळी दादासाहेब केळुसकर गुरुजी यांनी स्वलिखित भ.बुद्धाचे चरित्र विदयार्थी दशेतील भिमराव रामजी आंबेडकर यांना भेट दिले होते.केळुसकर गुरुजींनी दिलेल्या या ग्रँथामुळे भ.बुद्धाचे समतावादी व मनावतावादी विचार बाल भीमराव यांना वाचायला मिळाले.आणि याच ग्रथामुळे विदयार्थी दशेतील भीमरावांचे मन आणि मत परिवर्तन झाले. व पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतामध्ये लाखो बौद्ध अनुयांची क्रांती घडवून आणली.”असे भावपूर्ण उदगार भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक व बौद्धचार्य तसेच जेष्ठ विचारवंत जनीकुमार कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना काढले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा कणकवली शाखेचे कोषाध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले .यावेळी गाव शाखेचे संघटक एस आर कांबळे,बौद्धचार्य संतोष कदम,फोडाघाट ग्रामपंचायतीच्या सदस्या ऋतुजा जाधव आदी मान्यवर उवस्थित होते. या कार्यक्रमाची सुरवात त्रिशरण, पंचशील घेउन करण्यात आली. तर कार्यक्रमाची सांगता सरणातय घेऊन करण्यात आली.

You cannot copy content of this page