गाळेल दुर्घटनेत मृत झालेल्या गीतेश गावडेला शासकीय मदत मिळावी

बांदा सरपंच अक्रम खान यांची मागणी

*⚡सावंतवाडी ता.०२-:* गाळेल येथील दुर्घनेत मृत्यू पावलेल्या गीतेश गावडे या युवकाच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सरपंच अक्रम खान यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले गीतेश हा कर्ता पुरुष होता मात्र त्याच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याने शासनाने मदत देण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे यावेळी नगराध्यक्ष संजू परब, अक्रम खान, शीतल राऊळ, हेमंत मराठे, पापू कदम, सुनील धामापूर्कर ,वर्षा नाडकर्णी आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page