Headlines

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने अतिवृष्टीग्रस्ताना आवश्यक साहित्य वाटप

एक महिना पुरेल एवढे धान्य, कपडे पुरविले

*⚡सावंतवाडी ता.०२-:* अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद नेहमी सामाजिक भावनेतून काम करत आहे पत्रकारांच्या समस्या अडचणी सोडवण्या बरोबर समाजातील विविध समस्या व अडचणी मार्गी लावण्याच्या दृष्टीने ही नेहमी कार्य करीत आली आहे गेल्या बावीस जुलैला झालेल्या कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड भागातील पूर परिस्थिती अनेकांचे संसार कुटुंब व्यापार पूर्णपणे उघड्यावर पडले आहेत अशा कुटुंबीयांना उभारी देण्याच्या दृष्टीने मराठी पत्रकार परिषद ने पुढाकार घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तू कपडालत्ता व अन्नधान्य चे एक महिना पुरेल असे किट देऊन मदतीचा हात दिला आहे. या उपक्रमाला तिरुमला तेल कंपनी व बीड येथील कुटे फाउंडेशन यांच्या सहकार्याने सावंतवाडी कणकवली खारेपाटण आदी पूरग्रस्त भागातील दोनशेहून अधिक कुटुंबीयांना मदतीचा हात देत त्यांना पुन्हा एकदा नव्या जोमाने उभे राहण्याची ताकद दिली आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या जीवनावश्यक वस्तू तिरुमला तेल कंपनी आणि कुठे फाऊंडेशनच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले आहे सावंतवाडी तालुक्यात धवडकी कलंबिस्त इन्सुली शेरले ओटवणे विलवडे वाफोली या भागातील जवळपास शंभर कुटुंबियांना मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्हा पत्रकार संघ व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या माध्यमातून साहित्य वाटप करण्यात आले धवडकी इन्सुली ग्रामपंचायत कार्यालय शेरले विलवडे येथे मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार एड संतोष सावंत मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य हरिश्‍चंद्र पवार जिल्हा पत्रकार संघाचे माजी सचिव अभिमन्यू लोंढे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर विजय देसाई मयुर चरटकर उमेश सावंत गणेशप्रसाद गोगटे खजिनदार रामचंद्र कुडाळकर जतिन भिसे अनिल कुडाळकर अमोल टेमकर विश्वनाथ नाईक सुरेश गवस रघुनाथ मालवणकर प्रदीप कालवणकर इन्सुली सरपंच तात्या वेंगुरलेकर सचिन पालव भाजपचे तथा तिरुमला तेल कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर दादू कविटकर अभिषेक देऊळकर विकास लांडे श्री प्रदीप शिरसाट श्री कासकर प्रकाश मुरकर विजय राऊळ राजन राणे विश्वनाथ होडा वडेकर आदी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री गजानन नाईक म्हणाले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद च्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या कुटुंबियांचे दुःख हलके करण्याच्यादृष्टीने आम्ही जीवनावश्यक वस्तूंचे मदत करण्याचे ठरवले त्यानुसार एस एम देशमुख यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जीवनाश्यक वस्तू आणि तिरुमला तेल कंपन्या आणि फाउंडेशन च माध्यमातून देऊन एक मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न आहे सामाजिक भावनेतून पत्रकार परिषद काम करत आहे या उपक्रमाला जिल्हा पत्रकार संघ आणि तालुका पत्रकार संघा यांनी सहकार्य केले या वेळी बीड येथून टेम्पोतून हे साहित्य असणाऱ्या चालक व तिरुमल्ला कंपनीचे विजय हांडे व अभिषेक देऊळकर यांचा गौरवही करण्यात आला यावेळी या उपक्रमाच्या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत व विजय देसाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मांजरेकर यांनी पूर्व परिस्थितीने अनेकांचे कुटुंबीय व दुकाने व्यापार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत हे दुःख कधीही भरून न येणारे असे आहे पण यातून सावरण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही ही छोटीशी भेट देत आहोत सध्या पर्यावरण आणि निसर्ग वाचवणे आपल्या हातात आहे गावागावात पर्यावरण बचाव मोहीम हाती घेणे गरजेचे आहे तुम्ही सर्वांनी आता यातून एक धडा घ्या आणि गावातील बेकायदा वृक्षतोडीला आळा घाला आणि नैसर्गिक पूर्ण परिस्थितीला रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन केले.

You cannot copy content of this page