उद्योजक सागर वाडकर व बांधकाम सभापती मंदार केणी यांचा पुढाकार
मालवण दि प्रतिनिधी मालवणचे उद्योजक सागर वाडकर व मालवण नगर पालिकेचे बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या वतीने मालवण ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर येथील डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांना ग्लास फेसशिल्ड व कोविड किट सुपूर्द करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, नर्स व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सागर वाडकर यांचे नेहमीच ग्रामीण रुग्णालय मालवणला सहकार्य लाभत असल्याचे डॉ. बालाजी पाटील यांनी यावेळी सांगितले.
