Headlines

Global Maharashtra Breaking News

पूरजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा दलाच्यावतीने प्रशिक्षण

*⚡सावंतवाडी ता.०३-:* अचानक उद्भवणाऱ्या पूरजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सागरी सुरक्षा दलाच्या वतीने सावंतवाडी पोलिसांना मोती तलाव येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

Read Full News

हळवल गावात गवारेड्यांचे थैमान

वनविभागाने पाहणी करत केले पंचनामे *⚡कणकवली दि.०३-:* तौक्ते वादळ आणि त्यानंतर निर्माण झालेली पूरस्थिती यामुळे चिंताग्रस्त असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्याला कारण ठरतायत शेतीचे नुकसान करणारे गवारेडे कणकवली तालुक्यातील हळवल गावात गवारेड्यानी थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाने पाहणी करत पंचनामे केले आहेत. गेली चार वर्षे हळवल…

Read Full News

सेवानिवृत्त आदर्श प्राथ.शिक्षक शंकर केतकर यांचे निधन

*⚡कणकवली ता.०३-:* कासार्डे आनंदनगर येथील रहिवासी सेवानिवृत्त आदर्श प्राथमिक शिक्षक शंकर धाकटू केतकर गुरूजी ( वय ८१ ) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. केतकर गुरूजी कासार्डे साटमवाडी येथील प्राथमिक शाळेतून उच्च श्रेणी मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. विद्यार्थी प्रिय केतकर गुरूजी त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाचे होते.हरहुन्नरी व दानशूर व्यक्तिमत्व वेळप्रसंगी मदतीला धावून जाणे…

Read Full News

सिंधुदुर्ग भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्ली येथे घेतली भेट*

*⚡सावंतवाडी दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे जात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, सावंतवाडी शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, वेंगुर्ले-आसोली माजी सरपंच सुजाता देसाई, साक्षी सावंत, गीता परब, मेघना साळगावकर, आरती पाटील, सुजाता देसाई, वंदना खटावकर, प्रणाली माने, बेला पिंटो, अश्विनी गावडे आदी…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १०२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ५५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ३९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १०२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

विनसम क्रीडा मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय अभंग महोत्सव

श्रावण महोत्सव निमित्त आयोजन ओरोस-: सुप्रसिद्ध पखवाज वादक कै. रवींद्र गावडे यांच्या स्मरणार्थ कणकवली तालुक्यातील वागदे येथील विनसम क्रीडा मंडळाच्यावतीने “श्रावण महोत्सव” निमित्त राज्यस्तरीय अभंग स्पर्धा – २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक ३३३३ रुपये व आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र, द्वितीय पारितोषिक २२२२ रुपये व आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र तृतीय पारितोषिक ११११ रुपये व…

Read Full News

नवीन तुकडेबंदी परिपत्रकामुळे दस्त नोंदणी प्रक्रियेतील अडचणी दूर करा

आ. वैभव नाईक यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी *⚡कुडाळ ता.०३-:* राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ रोजी तुकडेबंदी तुकडे जोड (सुधारणा अधिनियम २०१५) ने मूळ अधिनियमात समाविष्ट केलेल्या कलम ८ ब ला अनुसरून परिपत्रक राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांना जारी केले आहे. सद्यस्थितीत या परिपत्रकाचा दूरगामी परिणाम दस्त नोंदणीवर होत…

Read Full News

अधिकाऱ्यांना धमकावून वेळ फुकट घालविण्यापेक्षा नारायण राणेंच्या माध्यमातून वंचित मच्छिमारांना मदत मिळवून द्यावी

दत्ता सामंत याना मंदार केणी यांचा सल्ला मालवण दि प्रतिनिधी तौक्ते वादळातील नुकसान ग्रस्त मच्छीमाराना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चांगली मदत केली असताना काही मच्छीमाराना मदत न मिळाल्याबाबत भाजपचे नेते दत्ता सामंत हे मत्स्य अधिकाऱ्यांना धमकावून याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधण्याची भाषा करत आहेत. मात्र, फयान वादळावेळी मंजूर झालेली मदत नुकसान ग्रस्तांना…

Read Full News

राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा

आशा, गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी नोकरी द्या;संघटनेचे तहसीलदारांना निवेदन वैभववाडी प्रतिनिधी राष्ट्रीय आरोग्य अभियान योजना कायम करुन त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दयावा.आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे.यासह विविध मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वैभववाडी शाखेच्यावतीने वैभववाडी नायब तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी अध्यक्ष नम्रता वळंजू, सचिव प्रणाली रावराणे,…

Read Full News

मालवण काँग्रेस च्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मालवण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मेघनाद धुरी, लक्ष्मीकांत परूळेकर, बाबा मेंडीस, विनोद गवंडे, गणेश भगत, मनिष भगत, रोहन कुमठेकर, हिमेश भगत, शॅडी फर्नांडिस, श्याम ढोके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

You cannot copy content of this page