हुंबरठ येथे दुचाकीचा अपघात : दोघे गंभीर जखमी…

⚡कणकवली ता.०६-: मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ येथील पावणादेवी मंदिरानजीक दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या दरम्यान घडला.

या अपघातात लबिक पटेल (वय २०, रा. हरकुळ खुर्द, ता. कणकवली) व केतन वाडे (वय २८, रा. मुंबई) हे दोघे गंभीर जखमी झाले. दुचाकीचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटून अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

अपघातानंतर जखमींना तात्काळ मदत करत पत्रकार भगवान लोके यांनी आपल्या वाहनातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

You cannot copy content of this page