वेंगुर्ला अग्निशमक बंब च्या सहकार्याने आग आटोक्यात..
⚡वेंगुर्ला ता.६-: तालुक्यातील दाभोली सड्यावर (पवनचक्की नजिक) येथे आज सोमवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आकस्मिक आग लागून येथील शेतकऱ्यांच्या काजू कलमांचे जळून नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच माजी जि. प. सदस्य बाबा राऊत, दाभोली माजी सरपंच सुचिता गोलतकर, पोलीसपाटील जनार्दन पेडणेकर, कोतवाल सुभाष दाभोलकर, ग्रा. पं. सदस्य सुशांत परब व अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये श्री. मालवणकर, श्री. कांदळकर, श्री. गोलतकर व अन्य शेतकऱ्यांच्या काजू कलमांचे जळून नुकसान झाले आहे. तसेच दुपारी 1.45 च्या सुमारास मठ गावठणवाडी येथेही आकस्मिक आग लागून झाडे जळाली आहेत. सुदैवाने वेळीच आग विझवल्याने नजीकची आंबा कलमे नुकसानी टळली आहे. मठ येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी वेंगुर्ला अग्नीशमन बंब च्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने आग विझविण्यात यश आले. यावेळी फायरमन नरेश परब, पंकज पाटणकर, देवेंद्र जाधव, अजय जाधव, लक्ष्मण जाधव, भाऊ कुबल आदी कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यास सहकार्य केले.
