खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार श्री 2026 शरीरसौष्ठव स्पर्धा…

विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने आयोजन..

⚡कणकवली ता.०७-: माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने व विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने ‘खासदार श्री २०२६’ या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा दि. १० एप्रिल रोजी सायं. ५.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे.

सदरची स्पर्धा ५५, ६०, ६५ व ७० अशा चार वजनी गटात होणार आहे. सदरची स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला ‘खासदार श्री २०२६’ हे प्रथम क्रमांकाचे बक्षिस रु. १५ हजार व चषक देऊन गौरविण्यात येणार आहेत. तसेच इतर आकर्षक बक्षिसेही असणार आहेत.

या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांनी केले आहे. तसेच अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी राजन परब ९४२२४३४४४४, अमित कदम ७५०६०७०७०२ येथे संपर्क साधावा.

You cannot copy content of this page