सावंतवाडी येथिल समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..

नगराध्यक्ष संजू परब यांनी अर्पण केला पुष्पहार

*💫सावंतवाडी दि.१४-:* भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३० वा जयंती उत्सव सावंतवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे. त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मानवंदना अर्पण करण्यात आली आहे. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक अँड परिमल नाईक, नगरसेविका सौ माधुरी वाडकर, नगरसेविका सौ भारती मोरे, नगरसेविका सौ शुभांगी सुकी, नगरसेविका सौ. दिपाली सावंत, नगरसेविका सौ दिपाली भालेकर, अँड. अनिल निरवडेकर, अमित परब तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून यावर्षीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page