आंबोलीच्या “त्या” निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची चौकशी लावून दाखवावीच…

*_▪️भाजप पदाधिकारी संतोष पालकर यांचे रुपेश राऊळ यांना आव्हान_*

आंबोली, ता.१४: आंबोली फौजदार वाडी गावठाण ओवळीची मोरी मुख्य रस्ता हा रस्त्या नित्कृष्ठ दर्जा चा करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा ठेकेदाराने केला आहे व त्याला सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त आहे. मिलीभगत करून शासकीय पैशाची रस्त्याच्या नावाखाली ही लूट आहे. त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख यांनी या कामाची चौकशी लावावीच आणि ठेकेदारावर कारवाई करून दाखवावी असे आव्हान भाजप चे पदाधिकारी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पालेकर यांनी प्रसिध्दी पत्रकद्वारे दिले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, आंबोलीतील शिवसेनेचे पदाधिकारयांचा वरदहस्त ठेकेदाराला लाभला आहे .आता हा रस्ता शिवसेनेच्या माध्यमातून आल्याने आणि आपल्या वॉर्डातील रस्ता म्हणून स्थानिक पदाधिकारी कामावर महिनाभर समोर राहून काम करून घेतात. आणि ठेकेदार बोगस काम करतो आणी पदाधिकारी लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करतात . त्यामुळे हा मिलीभगत भ्रष्टाचार आहे. कुठे पाणी मुरते हे लोकांना दिसत आहे. सत्ताधारी शिवसेनेचेच पदाधिकारयांचा वरदहस्त असल्यामुळे हा रस्ता नित्कृष्ठ दर्जा चा होत आहे .त्यामुळे या कामाची चौकशी लावावीच आणि खरोखरच कारवाई करून दाखवावी  आव्हान संतोष पालेकर यांनी दिले आहे.असे पत्रकातून श्री पालेकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page