देवगडात अवकाळी पाऊस…

आंबा बागायतींचे मोठे नुकसान

देवगड प्रतिनिधी देवगड तालुक्यामध्ये मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने आंबा बागायतदारांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे गेली दोन दिवस तालुका मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच मंगळवारी रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे हापूस आंब्याला त्याचा फटका बसणार आहे पंचवीस ते तीस मार्च दरम्यान अचानक उष्णतेत वाढ होऊन 40 डिग्री पेक्षा तापमान वाढले होते यामुळे आंबे भाजून खराब झाले होते यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते आता अवकाळी पावसामुळे आंब्यांवर ती डाग पडणे आंबे कुजणे त्‍यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत एक ना अनेक अशी संकटे आंबा बागायतदारांना समोर येऊन ठेवली आहेत उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था आंबा बागायतदारांची असतानाच आता अवकाळी पावसाचे मोठे संकट बागायतदारांना समोर उभे राहिले आहे तालुक्यात मधील बहुतांशी गावांमधील अवकाळी पाऊस पडल्याने आंबा बागायतीचे त्यांचे नुकसान झाले आहे

You cannot copy content of this page