आंबोलीतील “त्या” रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे…

*पालकमंत्री आणि खासदार यांच्यामार्फत लावणार संबंधित ठेकेदाराची चौकशी-:रूपेश राऊळ*

*💫आंबोली दि.१३-:* आंबोली फौजदार वाडी ते ओवळीची मोरी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम बोगस झाले आहे ठेकेदाराने येथे चुना लावला आहे.मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता केला असून अत्यंत सुमार दर्जाचे काम केले आहे.या कामाची चौकशी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यामार्फत तत्काळ चौकशी लावून ठेकेदारावर कारवाई करण्यास लावू असे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आंबोली येथे सांगितले. गावठाण वाडी येथील लोकांच्या गणपती विसर्जन रस्ता आणि मागणी नुसार येथील रस्ता आमदार दीपक केसरकर यांनी लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री सडक योजनेतून जवळपास दीड कोटीचा रस्ता येथे दिला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून हा निधी येथे आला आहे.असे असताना या रस्त्यात ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात बोगस काम करून लुटमार केली आहे.याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कामाला चुना लावून ठेकेदार मस्तीखोर पणा करत आहे. या कामाची चौकशी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार यांच्याकडून आपण लावणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.आज ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाबाबत श्री राऊळ यांच्याकडे तक्रार केली होती.

You cannot copy content of this page