काजू बागेला आग लागून दोन लाखांचे नुकसान..

तेरसे बांबारडे येथील अंकुश साटेलकर यांची बाग;२०० कलमे जळून खाक

कुडाळ : काजू बागेला आग तेर्सेबांबर्डे साटेलकरवाडी येथिल अंकूश परशुराम साटेलकर यांचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली असून सकाळी ती निदर्शनास आली. ही घटना रात्रीच्यावेळी घडल्याने ती कोणालाच समजले नाही. यानंतर अंकुश साटेलकर हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वा.आपल्या काजूच्या बागेत काजू काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना आपल्या बागेतील काजू कलमे जळालेली दिसली. या आगीत त्यांची उत्पन्न देणारी २०० काजू कलमे जळून खाक झाली. यात त्यांचे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. या घटनेची फिर्याद कुडाळ पोलिसात अंकुश परशुराम साटेलकर यांनी कुडाळ पोलिसात दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस श्री भांगरे करत आहेत.

You cannot copy content of this page