मोंडपार सडेवाडी येथील घटना
*💫देवगड दि.१३-:* चौथीत शिक्षण घेणाऱ्या सुरज रवींद्र चव्हाण रा.मोंडपार सडेवाडी या मुलाने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री १० वा.सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने मोंडपार परिसरात खळबळ उडाली आहे. परंतु या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरज यांनी सोमवारी रात्री जेवण करून झालेवर घरातील हॉलमध्ये टेबलावर चढून कापडी ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेदरम्यान घरात त्याची आई, भाऊ व आजी होती. आई घरात काम करत होती. वडील मोंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चालक म्हणून सेवेत असून ते घरी नव्हते. त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना त्याचा आईच्या निदर्शनास येताच तिने हंबरडा फोडला. सुरज हा बापर्डे येथील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजु शकले नाही. या घटनेने मोंडपार परिसर हादरून गेला आहे. या घटनेची खबर त्याचे वडील रवींद्र शांताराम चव्हाण यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. घटनेची माहिती समजताच देवगड पोलिस स्टेशनचे स.पो.निरिक्षक संजय कातिवले यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जावून माहिती घेतली व पंचनामा करून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेचा अधिक तपास एस्आय संदीप पडेलकर करीत आहेत.
