जकातवाडी येथे धान्य दुकानाचा शुभारंभ…

रूपेश राऊळ यानी केले उद्घाटन

*💫आंबोली,दि.१३-:* येथील जकात वाडी येथे शासकीय धान्य दुकान स्वयंभू महिला सहकारी संस्थेच्या मार्फत सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हा शासकीय धान्य दुकान चे तालुका अध्यक्ष रुपेश राऊळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिद्धेश शिरसाठ, विभागीय अध्यक्ष शशिकांत गावडे,संस्थेचे चेअरमन सौ सविता पाताडे,धान्य दुकान याठिकाणी सुरू करणारे शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते बुधाजी पाताडे,विजय राऊत, राऊत ,दिलीप गुरव,अनिल चव्हाण,हेमंत नार्वेकर,दीपिका मेस्त्री,शिवाजी गावडे,कानु गावडे, संजय चव्हाण,संजय परब,महेश पाटील,सौ मेस्त्री,भाऊ ओगले,विलास गावडे,गजानन कर्पे आदी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी फौजदार वाडी,गावठाण वाडी,जाधव वाडी,जकात,बाजार,नांगरवक,बंगलेवाडी येथील लोकांचे धान्य देण्यात येणार आहे.केरोसीन आंबोली आणि गेळे गावचे देण्यात येणार आहे. याठिकाणी जवळ धान्य दुकान झाल्याने ३किलोमिटर जाण्याचा लोकांचा त्रास वाचला त्यामुळे लोकांनी समाधान वेक्त केले.

You cannot copy content of this page