पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हैशीवर मगरिचा हल्ला…

गुराख्याने ओरड मारल्याने गेली पळून सांगेली खळणेवाडीतील बंधाऱ्यातील घटना

सावंतवाडी-: पाणलोटच्या बंधाऱ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हैशीवर मगरीने गुराख्याच्या समोरच हल्ला केल्याची घटना सांगेली खळणेवाडी येथे घडली. यावेळी गुराखी आरडाओरड करीत पुढे धावून गेल्याने मगरीने म्हैशीचा पाय सोडला. सांगेली येथील जयानंद पांडुरंग सावंत यांच्या म्हशी त्यांच्याच शेतात सिताराम सोनू नाटलेकर हा गुराखी चरायला घेऊन गेला होता. म्हशींना घेऊन घरी परतत असताना शेतातील पाणलोटच्या तळीतील पाणी पित असतानाच मगरीने हा हल्ला केला. तळीतील मगरीने म्हशीच्या मागच्या डाव्या पायाला लक्ष केल्याने या हल्ल्यात पायावर मगरीचे खोलवर दात लागले. त्यामुळे या पायाला मोठी दुखापत झाली. दरम्यान याबाबत वनपाल श्री ढेकळे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

You cannot copy content of this page