‘त्या’ दोन्ही ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी वेधले होते लक्ष

*💫सावंतवाडी दि.१४-:* हेल्थ फॉर्म येथे सुरू असलेल्या कोविड सेंटर मध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालय तसेच शेर्ले येथील कोविड सेंटर त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. यानुसार पालकमंत्री उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात या दोन्ही ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती रुपेश राऊळ यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page