वेंगुर्ला श्री देव रामेश्वर देवस्थान ” क ” वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र बाबत ठराव मंजूर…

वेंगुर्ला श्री देव रामेश्वर देवस्थान ” क ” वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र बाबत ठराव मंजूर..

वेंगुर्ला
वेंगुर्ला नगरपरिषदेची विशेष सभा आज सोमवारी (6 एप्रिल ) वेंगुर्ला नगरपरिषद श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी वेंगुर्ला श्री देव रामेश्वर देवस्थान ” क ” वर्ग दर्जाचे तीर्थक्षेत्र बाबत विशेष सभेत ठराव मंजूर करण्यात आला.आज झालेल्या विशेष सभेत शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळा निरलेखन बाबत सर्वच सदस्यांनी जोरदार मते मांडली. या निरलेखन बाबत नगरपरिषद प्रशासनास कोणतीही कल्पना न देता सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत निवासी शाळा उभारण्यात येत आहे. त्यामुळे अध्यक्ष यांच्यासह सर्वच सदस्य अनभिज्ञ् आहेत. त्यामुळे याबाबत तात्काळ पंचनामा व कार्यवाही व्हावी व संबंधित विभागास उच्चस्तरीय पत्रव्यवहार करण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला. तसेच नाटककार मधुसूदन कालेलकर येथील सर्व कामे व इतर अनुषंगिक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. कुडाळ नगरपरिषद कडील कचरा घेण्याचे ठरले. याबाबत आ. निलेश राणे यांची शिफारस घेऊन खासदाराना पत्रव्यवहार करण्याचे ठरले. तसेच इतर विषयावर चर्चा झाली.
यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, संदेश निकम, सचिन शेट्ये, युवराज जाधव, विनय नेरुरकर, दाजी परब, प्रशांत आपटे, रवी शिरसाट, सदानंद गिरप, नगरसेविका आकांक्षा परब, शीतल आंगचेकर, सुषमा प्रभूखानोलकर, सुमन निकम, काजल कुबल, गौरी मराठे, समिधा रेडकर,लीना म्हापणकर,प्रशासकीय अधिकारी अभिजित पाटील, विशाल होडावडेकर, गणेश कांबळी ,अधिकारी वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page