Headlines

Global Maharashtra Breaking News

उपजिल्हा रुग्णालय संदर्भात वारंवार अर्ज करूनही सा.बां.कडून दखल नाही

युवा रक्तदाता संघटना १५ ऑगस्टला अधिकाऱ्यांना घालणार घेराव *⚡सावंतवाडी ता.०६-:* सार्वजनिक बांधकाम विभागाला उपजिल्हा रुग्णालय संदर्भात वारंवार अर्ज करून देखील कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे येत्या १५ ऑगस्टला ध्वजारोहणानंतर संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरून हलू दिले जाणार नाही. असा इशारा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात असे म्हटले की, सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयातील…

Read Full News

सोमवारपासून भारमान असलेल्या भागातील तर 15 ऑगस्टपासून नियमित एसटी फेऱ्या सुरु होतील

कणकवली तालुका भाजपा शिष्टमंडळाला विभाग नियंत्रकांचे आश्वासन *⚡कणकवली दि.०६-:* कोकणातील सर्वात मोठा गणेश चतुर्थी सन आहे. त्यावेळी मुंबईहून मोठया प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्यामुळे त्यांचीही प्रवासाची सोय होणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या बंद असलेली ग्रामिण भागातील एस.टी ची बस सेवा कीमान 50 टक्के क्षमतेने तसेच सोशल डीस्टंसींगचे नियमांचे पालन करून सुरू करणेत यावी अशी…

Read Full News

कामाच्या तणावातही आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा मोठा तणाव असतो. पण या तणावामध्ये ही आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. विशेषतः मानसिक आरोग्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सहाय्यक…

Read Full News

देवबाग किनारी मिळाली मौल्यवान देवामाशाची उलटी

वनविभागाने ११ किलोचा पदार्थ घेतला ताब्यात *⚡मालवण दि.०६-:* पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या देवबाग ख्रिश्चनवाडीच्या समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी फ्रान्सिस जॉन फर्नांडिस आणि किस्तु लुद्रीक या मच्छीमारांना मौल्यवान असा ‘अंबरग्रीस’ हा देवमाशाच्या (व्हेल मासा) उलटीसदृश अत्यंत सुवासिक व मौल्यवान पदार्थ सापडला असून सुमारे ११ किलो वजनाची ही उलटी वनविभागाने ताब्यात घेतली आहे पीठासारखा चिकट असलेला हा पदार्थ…

Read Full News

मायनिंग विरोधात कळणेवासियांच्या आंदोलनात मनसेची सामील होणार

मायनिंगमुळे किती गावकऱ्यांना रोजगार मिळाला याचे उत्तर द्या:परशुराम उपरकर यांचा सवाल *⚡कणकवली दि.०६-:* जिल्हाधिकाऱ्यांनी तूर्तास मायनिंग बंदचा इशारा जरी दिला असला, तरी हे मायनिंग कधीपर्यंत बंद ठेवले जाणार याविषयी शंका आहे. त्यामुळेच मायनिंग पूर्णतः बंद करण्यात यावे या मागणीसाठी कळणेवासियांनी १४ आॕगस्टनंतर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असून मनसे या…

Read Full News

आंदूर्ले येथे झालेल्या चोरी प्रकरणी निवती पोलिसांनी दोघांना केली अटक;

मुद्देमाल जप्त *⚡वेंगुर्ला दि.०६-:* आंदूर्ले येथे झालेल्या चोरी प्रकरणी निवती पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री दोघांना अटक केली.त्यांना आज कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिनार दिलीप खानविलकर (२४),रा. पिंगुळी-सराफदारवाडी व विशाल सुरेश वाडेकर (२१) रा.आवेरे-वेगुर्ले,अशी या दोघांची नावे आहेत. दोघांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी निवती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. निवती पोलीस…

Read Full News

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी १७५ कोटी रुपये मंजूर

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी कणकवली व देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प अंतर्गत धरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने धरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पत्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना देण्यात आले आहे. यात कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला १७५…

Read Full News

डास निर्मूलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली निवेदने ही निव्वळ नौटंकी

राष्ट्रवादीने स्टंटबाजी बंद करावी:सुधीर आडीवरेकर *⚡सावंतवाडी ता.०६-:* डास निर्मूलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली निवेदने हे निव्वळ नौटंकी असून नगरपालिका यासाठी चोख काम करत असून त्यामुळे राष्ट्रवादीने स्टंटबाजी बंद करावी असा टोला सभापती सुधीर आडीवरेकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला. तसेच ते बोलताना पुढे म्हणाले नेहमी जयप्रकाश चौकात साचणारे पाणी ही यावर्षी अतिवृष्टी देखील साचले नसून हे…

Read Full News

शॉक लागून खासकीलवाडा येथील युवकाचा मृत्यू

*⚡सावंतवाडी ता.०६-:* शहरातील खासकिलवाडा येथील युवकांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. अभिजित आराबी कर असे त्या युवकाचे नाव आहे. हा युवक उभा बाजार येथे काम करत असताना ही घटना घडली आहे. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे

Read Full News

लसीकरणाबाबत पसरविले जाणारे गैरसमज व डॉ.उत्तम पाटील यांच्यावर होणारी टीका चुकीची

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी मांडली बाजू *⚡सावंतवाडी ता.०६-:* कोविड डोसबाबत सावंतवाडीत पसरवले जाणारे गैरसमज व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ उत्तम पाटील यांच्वयावर होणारी टीका ही चुकीची व दुर्दैवी असून गोव्याच्या धर्तीवर आपल्याकडे जर लसीकरण झाले तर सर्वांना याचा लाभ घेता येईल असे मत श्री.देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर…

Read Full News

You cannot copy content of this page