सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी मांडली बाजू
*⚡सावंतवाडी ता.०६-:* कोविड डोसबाबत सावंतवाडीत पसरवले जाणारे गैरसमज व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ उत्तम पाटील यांच्वयावर होणारी टीका ही चुकीची व दुर्दैवी असून गोव्याच्या धर्तीवर आपल्याकडे जर लसीकरण झाले तर सर्वांना याचा लाभ घेता येईल असे मत श्री.देव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडले आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रक दिली असून यात असे म्हटले की कोविड सारख्या महामारीत डॉक्टर्स नर्स अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर तसेच साफसफाई कामगार जीवाची पर्वा न बाळगता देव दूतासारखे आपली कामगिरी जिल्ह्यात बजावत असून काही राजकारणी आरोग्य कर्मचाऱ्यांवर करणारी टीकाही दुर्दैवी असल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
