*⚡कणकवली ता.०६-:* माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने त्यांच्या जनशिक्षण संस्था, कुडाळ यांच्या माध्यमातून कळसुली हायस्कुलला मुलींसाठी 10 लेडीस सायकल देत हायस्कुलमध्ये सायकल बँक चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जनशिक्षण संस्थेचे प्रतिनिधी विलास हडकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जि.प. सदस्य सायली सावंत, तालुका उपाध्यक्ष शशिकांत राणे, भाजपा जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, कळसुली उपसरपंच सचिन पारधीये, समीर सावंत, शामसुंदर दळवी, स्वप्नील गोसावी, कमलाकर दळवी, राजू नार्वेकर, सुहास परब, अरुण दळवी, पंकज सावंत, भारती देसाई, कळसुली हायस्कुल चेअरमन के. आर. दळवी, कळसुली हायस्कुलचे मुख्याध्यापक वगरे आणि सर्व शिक्षक, आणि हायस्कुलच्या पहिल्या टर्म मधील लाभार्थी मुली आणि पालक हे उपस्थित होते. ज्या सायकल पुढील काळात कळसुलीतील गरीब, गरजू आणि लांब पल्ल्याच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी उपयोगात येतील अशापद्धतीने दर वर्षी वेगवेगळ्या मुलींना सायकल बँक चा फायदा आपल्या हायस्कुलमध्ये घेता येईल. अशाच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हायस्कुल मध्ये या वेळेस 1000 सायकल बँक या संकल्पनेसाठी जिल्ह्यातील हायस्कुलना वाटप करण्यात आल्या व पुढील काळात अशीच प्रत्येक हायस्कुलची सायकल बँक मोठी व्हावी म्हणून पुढच्या काळातही सुरेशजी प्रभू त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करतीलच परंतु ही बँक मोठी होण्यासाठी माजी विध्यार्थांनीही सहकार्य करावे असे आवाहनही केले गेले आहे.
कळसुली हायस्कुलमधील 10 मुलींना जनशिक्षण संस्थेतर्फे सायकल प्रदान
