सोमवारपासून भारमान असलेल्या भागातील तर 15 ऑगस्टपासून नियमित एसटी फेऱ्या सुरु होतील

कणकवली तालुका भाजपा शिष्टमंडळाला विभाग नियंत्रकांचे आश्वासन

*⚡कणकवली दि.०६-:* कोकणातील सर्वात मोठा गणेश चतुर्थी सन आहे. त्यावेळी मुंबईहून मोठया प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्यामुळे त्यांचीही प्रवासाची सोय होणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या बंद असलेली ग्रामिण भागातील एस.टी ची बस सेवा कीमान 50 टक्के क्षमतेने तसेच सोशल डीस्टंसींगचे नियमांचे पालन करून सुरू करणेत यावी अशी मागणी कणकवली तालुका भाजपाच्या शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांची भेट घेत निवेदन देत केली. सोमवारपासून भारमान असलेल्या भागातील एसटी फेर्‍या सुरू करण्यात येतील व 15 ऑगस्टपासून ग्रामीण भागातील नियमित एसटी फेऱ्या सुरळीत करण्यात येतील असे आश्वासन प्र. विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांनी दिले. यावेळी कोरोनाच्या पाश्वभूमीवर ग्रामिण भागातील एस.टी वाहतूक मोठया प्रमाणात बंद झालेली आहे.त्यामुळे ग्रामिण भागातील लोकांची मोठया प्रमाणात गैरसोय झालेली आहे. तसेच दैनंदीन व्यवहारासाठी लोकांना सतत तालूक्याच्या ठीकाणी यावे लागते. त्यासाठी एस.टी सेवा दूसरा पर्याय नाही. पंरतू आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असूनही तसेच मोठया प्रमाणत लसिकरण होऊनही आपल्या विभागामार्फत बऱ्याच ठिकाणच्या एस.टी गाडया पूर्वीप्रमाणे नियमित सोडल्या जात नाहीत. याबाबत कणकवली तालुका भाजपा च्या शिष्टमंडळाने विभाग नियंत्रकांची भेट घेत निवेदन दिले. परीणामी यासंदर्भात बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत.नियमित पूर्वीप्राणेच गाडया ग्रामिण भागात पोहोचत नसल्याने ग्रामिण भागातील लोकांचे माठे आर्थिक नुकसान होत आहे. आता नजिकच्या काळात कोकणातील सर्वात मोठा असा गणेश चतुर्थी सन आहे. त्यावेळी मुंबईहून मोठया प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्यामुळे त्यांचीही प्रवासाची सोय होणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या बंद असलेली ग्रामिण भागातील एस.टी ची बस सेवा कीमान 50 टक्के क्षमतेने तसेच सोशल डीस्टंसींगचे नियमांचे पालन करून सुरू करणेत यावी. जेणेकरून ग्रामिण भागातील लोकांचे, विदयार्थ्यांचे तसेच ममुंबईतील येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार नाहीत.तसेच प्रवासाची गैरसोय दूर होईल. तरी वरील सर्व बाबींचा विचार करून संपूर्ण कणकवली तालुक्याच्या प्रत्येक ग्रामिण भागात जाणाऱ्या बस फेऱ्या नियमांचे पालन करून 50 टक्के क्षमतेने सुरू करणेबाबतचे आदेश आपले स्तरावरून तात्काळ निर्गमित करणेत यावेत. तसेच फेऱ्यांचे नियोजना बाबत जनजागृती करा. दर आठवड्याला नियोजन जाहीर करा. वस्तीच्या फेऱ्या सुरू करा अशी मागणी भाजपा शिष्टमंडळाने विभाग नियंत्रक यांच्याकडे केली. सोमवारपासून भारमान असलेल्या भागातील एसटी फेर्‍या सुरू करण्यात येतील व 15 ऑगस्ट पासून ग्रामीण भागातील नियमित एसटी फेऱ्या सुरळीत करण्यात येतील असे आश्वासन प्र. विभाग नियंत्रक रमेश कांबळे यांनी दिले. यावेळी सभापती मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष आणा कोदे, शामसूंदर दळवी, संतोष पुजारे, गणेश तळगावकर, कलमठ शक्ती केंद्रप्रमुख स्वप्नील चिंदरकर, संजय ठाकूर, विभागीय वाहतूक अधिकारी मोहनदास खराडे, आगार प्रमुख प्रमोद यादव, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page