मुद्देमाल जप्त
*⚡वेंगुर्ला दि.०६-:* आंदूर्ले येथे झालेल्या चोरी प्रकरणी निवती पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री दोघांना अटक केली.त्यांना आज कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिनार दिलीप खानविलकर (२४),रा. पिंगुळी-सराफदारवाडी व विशाल सुरेश वाडेकर (२१) रा.आवेरे-वेगुर्ले,अशी या दोघांची नावे आहेत. दोघांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी निवती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. निवती पोलीस ठाण्यात तक्रारदार सुर्यकांत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आंदूर्ले भुताचा सडा येथील गुरव यांच्या बागेत आपण व रोहित गुजर कामाला आहोत. २५ जुलै रोजी आम्ही आमच्या घरी पाटण सातारा येथे गेलो होतो. परत आल्यानंतर बागेतील शेत मांगर पाहिला असता या मांगराचा सिमेंटचा दरवाजा तुटलेल्या स्थितीत दिसून आला. आत जाऊन पाहिले असता बागेत झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारी गोल्डन कंपनीची सुमारे 27 हजार रुपये किमतीची साॅ-कटर मशीन आणि सुमारे 12 हजार रुपये किमतीची एअर गन चोरीस गेली आहे. त्यामुळे त्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. दरम्यान निवती पोलिस निरीक्षक श्री.साळुंखे यांच्यासह पीएसआय बगळे, पोलीस श्री.कांबळे, श्री. लोणे, श्री. शेडगे या पथकाने तत्काळ तपासाची सूत्रे हलवून त्या दोन्ही संशयितांना काल रात्री मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्या दोघांना आज कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी अधिक तपास निवती पोलीस करत आहेत.
