Headlines

कौस्तुभ सोनवडेकरचे मैदानी क्रीडा स्पर्धेत सुयश…

⚡मालवण ता.१५-:
मालवण येथील भंडारी ए. स. कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी कौस्तुभ सोनवडेकर याने मालवण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. कौस्तुभ याने लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला तर १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला आहे.

या कामगिरीच्या जोरावर कौस्तुभची जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कौस्तुभच्या या यशाबद्दल भंडारी एज्यूकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य आर. डी. बनसोडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page