डास निर्मूलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली निवेदने ही निव्वळ नौटंकी

राष्ट्रवादीने स्टंटबाजी बंद करावी:सुधीर आडीवरेकर

*⚡सावंतवाडी ता.०६-:* डास निर्मूलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली निवेदने हे निव्वळ नौटंकी असून नगरपालिका यासाठी चोख काम करत असून त्यामुळे राष्ट्रवादीने स्टंटबाजी बंद करावी असा टोला सभापती सुधीर आडीवरेकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला. तसेच ते बोलताना पुढे म्हणाले नेहमी जयप्रकाश चौकात साचणारे पाणी ही यावर्षी अतिवृष्टी देखील साचले नसून हे नगरपालिकेच्या चोख कामाचे प्रतीक प्रतीक असून नगरपालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले

You cannot copy content of this page