Headlines

Global Maharashtra Breaking News

कोकणवासीयांच्या मदतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते धावले

तब्बल 22 तास प्रवास करून चार टन मदत घेवून पोहोचले *⚡दोडामार्ग ता.०८सुमित दळवी-:* कोकणवासीयांच्या मदतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तब्बल 22 तास प्रवास करून मदत घेवून पोहोचले.या वर्षीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणला पण मोठ्या प्रमाणात पूराचा तडाखा दिला. कोकणातील बऱ्याच कुटुंबांचे संसार पूरात वाहून गेले. या पूरग्रस्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात सरसावले. सह्याद्री प्रतिष्ठान हि अशीच…

Read Full News

देवगडात नुकसान होऊनही कोरोना काळात मच्छिमारांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले

प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मागणी *⚡देवगड ता.०८-:* कोरोना संक्रमण काळात तौक्ते चक्रीवादळ मध्ये नुकसान झालेले काही मच्छिमार सभासद क्वारंटाईन असल्याने त्यांचे नुकसानीचे नुकसानीचे पंचनामे करणे शक्य झाले नाही. त्या काळात कोरोना वाढता संसर्ग असताना अनेक मच्छिमार सभासदांना घरीच रहावे लागले त्यामुळे नुकसान होऊन ही पंचनामे होऊ शकले नाही .या सर्व मच्छिमार सभासदांच्या…

Read Full News

रणजित देसाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

_______________________________________ *_🌷…शुभेच्छा…शुभेच्छा… शुभेच्छा…🌷_* _🎂🌷सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा गटनेते *श्री रंजीत देसाई* यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂🌷_ *💐🌹शुभेच्छुक💐🌹* 💐 ▪️ *🌷सौ..संजना सावंत* _जिल्हा परिषद अध्यक्ष_ 💐 ▪️ *🌷श्री. दत्ता सामंत 🌷* _भाजप प्रांतिक सदस्य_ 💐 ▪️ *🌷श्री. विशाल परब🌷* _भाजप युवा नेते_ 💐 ▪️ *🌷श्री. श्री अतुल काळसेकर🌷* _भाजप पदाधिकारी_ 💐 ▪️ *🌷सौ संध्या…

Read Full News

वेंगुर्लेतील सात हायस्कूलमधील ६० विद्यार्थिनींना सायकल प्रदान

वेंगुर्ला प्रतिनिधी-माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या मार्फत तसेच मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेंतर्गत जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्गतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील सात हायस्कूलमधील ६० विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या. अणसूर-पाल हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परिवर्तन केंद्राचे समन्वयक विलास हडकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, जेष्ठ नेते बाळा सावंत,…

Read Full News

कोटकामते ग्रा.पं.च्या अनियमित कारभाराबाबत चौकशी अहवाल देण्यास दिरंगाई

उपसरपंचासह ग्रा .प .सदस्य ग्रामस्थांसमवेत १५ ऑगस्ट रोजी करणार लाक्षणिक उपोषण *⚡देवगड ता.०८-:* कोटकामते ग्रामपंचायतीच्या अनियमित कारभाराबाबत चौकशी अहवाल देण्यात दिरंगाई होत असल्याच्या विरोधात कोटकामते ग्रा प चे उपसरपंच ग्रा .प .सदस्य ग्रामस्थांसमवेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण देवगड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड यांना दिले आहे….

Read Full News

तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची बदली रद्द करा

भाजपच्या महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी केली मागणी *⚡सावंतवाडी ता.०८-:* तालुक्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी येथे बदली झाल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रातून बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यावेळी भाजपच्या महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी देखील ही बदली रद्द करावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रक दिले असून त्यात असे…

Read Full News

गटारी साजरी करताय; सावधान

पोलिसांची असणार करडी नजर *⚡सावंतवाडी ता.०७-:* शहरात उद्या गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र पोलिसांची करडी नजर असणार असून, शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष करून सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची लक्ष असणार आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे. यासाठी मुख्य कार्यालयातून आणखी पोलिस फौज मागवण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली…

Read Full News

आनंदव्हाळ येथे गोवा बनावटीची दारू जप्त

गस्ती दरम्यान मालवण पोलिसांची कारवाई मालवण : (प्रतिनिधी) मालवण पोलिसांनी गस्ती दरम्यान आनंदव्हाळ येथे कृष्णनाथ श्रीपाद पाटील याच्या ताब्यातून गोवा बनावटीच्या दारूचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली. याप्रकरणी कृष्णनाथ पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू…

Read Full News

मालवण शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न बनतोय गंभीर

गवंडीवाडा भागात गाय व वासरू बेवारस स्थितीत;मालकाचा होतोय कानाडोळा *⚡मालवण ता.०७-:* मालवण शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून यात मोकाट गुरांची परवड होत असल्याचेही प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शहरात एक गाय व तिचे नुकतेच जन्मलेले वासरू बेवारस स्थितीत फिरत असल्याची घटना घडली असतानाच अश्याच प्रकारे गवंडीवाडा भागात एक गाय व तिचे वासरू…

Read Full News

सावंतवाडी गरड परिसरात दुचाकीला अपघात ; पती-पत्नी जखमी

जखमींना काँगेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले रुग्णालयात दाखल *⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी गरड येथे दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला असून, या अपघातात पती-पत्नी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. दरम्यान तिथून आपल्या कार ने काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष महेंद्र सांगेलकर हे जात असताना, त्यांनी ही घटना पाहिले . यावेळी त्यांनी तात्काळ…

Read Full News

You cannot copy content of this page