पोलिसांची असणार करडी नजर
*⚡सावंतवाडी ता.०७-:* शहरात उद्या गटारी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र पोलिसांची करडी नजर असणार असून, शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष करून सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची लक्ष असणार आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे. यासाठी मुख्य कार्यालयातून आणखी पोलिस फौज मागवण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
