तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची बदली रद्द करा

भाजपच्या महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी केली मागणी

*⚡सावंतवाडी ता.०८-:* तालुक्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची रत्नागिरी येथे बदली झाल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रातून बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यावेळी भाजपच्या महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी देखील ही बदली रद्द करावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रक दिले असून त्यात असे म्हटले की तहसीलदार म्हात्रे यांनी तालुक्यात खूप चांगल्या प्रकारे काम केले असून, प्रत्येक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष घालून काम केले आहे. तसेच संकट काळात देखील नागरिकांना धीर देऊन मदत केली आहे. अशा चांगल्या अधिकाऱ्याची बदली करणे चुकीची असून, त्यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page