उपसरपंचासह ग्रा .प .सदस्य ग्रामस्थांसमवेत १५ ऑगस्ट रोजी करणार लाक्षणिक उपोषण
*⚡देवगड ता.०८-:* कोटकामते ग्रामपंचायतीच्या अनियमित कारभाराबाबत चौकशी अहवाल देण्यात दिरंगाई होत असल्याच्या विरोधात कोटकामते ग्रा प चे उपसरपंच ग्रा .प .सदस्य ग्रामस्थांसमवेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी लाक्षणिक उपोषण देवगड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड यांना दिले आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून प्राप्त २७ मे च्या पत्रानुसार गेले दोन महिन्याचा कालावधी उलटूनही अद्यापही चौकशी अहवाल प्राप्त झाला नसून याबाबत वारंवार विचारणा करूनही राजकीय दबावामुळे या चौकशी अहवालात विलंब होत आहे असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे त्याविरोधात मे १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सकाळी ११ वाजता देवगड पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती गावचे ग्रामस्थ विद्यमान उपसरपंच विद्यमान उपसरपंच विजय कुडपकर तसेच ग्रा प सदस्य पुंडलिक उर्फआप्पा खाजणवाडकर,गणेश घाडी,सुनील कामतेकर व अन्य यांनी दिला आहे.
