आनंदव्हाळ येथे गोवा बनावटीची दारू जप्त

गस्ती दरम्यान मालवण पोलिसांची कारवाई

मालवण : (प्रतिनिधी) मालवण पोलिसांनी गस्ती दरम्यान आनंदव्हाळ येथे कृष्णनाथ श्रीपाद पाटील याच्या ताब्यातून गोवा बनावटीच्या दारूचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली. याप्रकरणी कृष्णनाथ पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे ओटवणेकर यांनी सांगितले. एकूणच अवैध धंद्यांविरोधात कारवाई मोहीम तीव्र केल्याचेही ओटवणेकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page