कोकणवासीयांच्या मदतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते धावले

तब्बल 22 तास प्रवास करून चार टन मदत घेवून पोहोचले

*⚡दोडामार्ग ता.०८सुमित दळवी-:* कोकणवासीयांच्या मदतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तब्बल 22 तास प्रवास करून मदत घेवून पोहोचले.या वर्षीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कोकणला पण मोठ्या प्रमाणात पूराचा तडाखा दिला. कोकणातील बऱ्याच कुटुंबांचे संसार पूरात वाहून गेले. या पूरग्रस्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात सरसावले. सह्याद्री प्रतिष्ठान हि अशीच एक महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करणारी संस्था…आणी या संस्थेंचे महाराष्ट्रभर पसरलेले कार्यकर्त्यांचे जाळे…… या सर्वांच्या समन्वयातून सूरू झाला मदतीचा ओघ….. सिंधुदुर्गात यावर्षी पावसाने कधी नव्हे एवढा धुमाकुळ घालत कोट्यावधी चे नुकसान केले. माडखोल धवडकी येथे संपुर्ण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे, मूर्तीकारांचे नुकसान झाले. हि घटना सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्याना समजताच लासूरगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर(औरंगाबाद) येथील प्रमोद नेरके,भारत वर्मा, गणेश वर्मा, राजेंद्र शहाबादे, रूपेशकाका वर्मा आकाश शेळके. यांनी लासूरगाव, शिवराई,दहेगाव,पालखेड या गावातील गावकऱ्यांनी केलेली मदत तब्बल २२ तास प्रवास करून सुमारे चार टन एवढी मदत स्वतः पोहोचविण्याचे काम केले. यावेळी सिंधुदुर्ग विभागाचे संघटक सुनिल राऊळ, दूर्गसेवक सिद्धेश परब, आबा आईर, चिंटु आईर, सुधीर राऊळ, केदार देसाई, अनिकेत धुरी, माडखोल ग्रामस्थ विकास महाडेश्वर, जयु मडगावकर, अमित राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page