अल्पवयीन युवतीला फूस लावून पळविल्याची तक्रार वेंगुर्ले पोलिसात
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल *⚡वेंगुर्ला ता.१४-:* वेंगुर्ला शहरात राहणा-या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास फूस लावून पळवले असल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दिलेली असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक केसरकर करीत आहेत.
