*⚡मालवण ता.१४- :* शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्गच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महादेव पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा .आ. केंद्र बांदा अंतर्गत कार्यरत पूरग्रस्त, आशाताई तसेच सातोसे येथील गरजू कुटुंबास मदत करण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष समीर सावंत, कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, संपर्क प्रमुख उमेश मांजरेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष यामेश्वर कवठणकर संघटनेचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर, संदेश कवठणकर, अमोल सातार्डेकर व शिवकन्या तसेच आशाताई समिधा तावडे व पूरग्रस्त आशा व गरजू कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या.
