Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४७हजार ९२४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ५२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read Full News

वेंगुर्लेत भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग : जन आशीर्वाद यात्रेदरम्यान बेकायदा जमाव करून घोषणाबाजी *⚡वेंगुर्ले ता.३०-:* भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान वेंगुर्ले मध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३ (१) (३) अन्वये असलेल्या मनाई आदेशाचा आणि जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या कोरोना विषाणु साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना सूचना या दोन्हींचा भंग केल्या प्रकरणी…

Read Full News

सावंतवाडीत विजेचा सुरू आहे लपंडाव

दुरुस्ती गणेशोत्सव पूर्वी करा;सेनेचे उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी यांची मागणी *⚡सावंतवाडी ता.३०-:* तालुक्यासह ग्रामीण भागात देखील वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने त्या भागातील नागरिकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. काहीच दिवसांवर गणेशोत्सव आला असल्याने, तात्काळ विज वाहिन्यांची डागडुजी करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनी महावितरण अभियंता यांची भेट घेऊन केली…

Read Full News

पत्रकार अनिल तोंडवळकर यांना मातृशोक

*⚡मालवण ता.३०-:* मालवण तालुक्यातील वेरली मुणगेकर वाडी येथील रहिवासी श्रीमती. सरोजिनी विनायक तोंडवळकर (८४) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे. तिने मुली सुना जावेई दोन भाऊ जावा पुतणे भाचे नातवंडे असा परिवार आहे. माजी सैनिक विश्वास (बाळू) तोंडवळकर. व्यवसायिक सुमंत तोंडवळकर , पत्रकार अनिल तोंडवळकर यांच्या त्या मातोश्री होत

Read Full News

कट्टा गुरामवाडी येथे शेतकरी दिन साजरा

*⚡मालवण ता.३०-:* राज्य शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती शेतकरी दिन म्हणून कट्टा गुरामवाडी येथील प्रगतशील शेतकरी शेखर कुडाळकर यांच्या निवासस्थानी जि. प. सदस्य संतोष साटविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. डॉ. विखे-पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रताप…

Read Full News

कोल्हापूर राधानगरी दाजीपूर पर्यटन सफारी प्रमाणेच सिंधुदुर्ग दाजीपुर पर्यटन सफारी सुरू व्हावी

*⚡कणकवली ता.३०-:* हिरव्या रंगाच्या नाना छटांनी, विविध प्रकारचे फुलझाडे, वन्यप्राणी, पक्षी यांनी नटलेल्या महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य असलेल्या कोल्हापुरातील राधानगरी अभयारण्यातील पर्यटन वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘बस सफारी’चे उदघाटन कोल्हापूरचे पालकमंत्री – ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय मंडलिक, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, विभागीय…

Read Full News

वाहतूक पोलीसांच्या सतर्कतेमुळे म्हापसा येथील तरुण अखेर कुटूंबीयांच्या ताब्यात

*⚡कणकवली ता.३०-:* गोवा म्हापसा येथून ५ दिवसापूर्वी बेपत्ता झालेला रुदरेश पिळणकर( वय २४) यास खारेपाटण कोविड ड्युटी वरील असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.त्या युवकाला आई वडिलांच्या ताब्यात दिले.बेपत्ता मुलाचे आईवडिलांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.वाहतूक पोलीस प्रकाश गवस , खारेपाटण पोलीस उद्धव साबळे, सुयोग पोकळे यांच्या दक्षतेने ”तो ”युवक घरच्यांच्या ताब्यात देण्यात यश आले आहे….

Read Full News

मसुरेतील माता काशीबाई परब मेमोरियल ट्रस्ट निवडी बिनविरोध

अध्यक्ष प्रकाश परब, सेक्रेटरी अशोक मसुरकर *⚡मालवण ता.३०-:* मसुरे येथील माता काशिबाई महादेव परब मेमोरियल चॅरीटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महादेव परब यांची तर सेक्रेटरी पदी अशोक रामचंद्र मसुरेकर यांची बिनविरोध निवड मसुरे येथे करण्यात आली. कामगार नेते स्व. जयवंत परब यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदी प्रकाश परब यांची निवड…

Read Full News

मडुरा-सातोसे मार्गावरील झुडपे चतुर्थीपूर्वी हटवा

पिंट्या परब : अपघात घडूनही प्रशासनाचे दुर्लक्ष *⚡बांदा ता.३०-:* मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांना गोव्यात जाण्यासाठी मडुरा-सातोसे-सातार्डा मार्ग सोयीचा असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली असून बऱ्याच दिवसांपासून ती तोडलेली नाहीत. यामुळे वाहनचालकांना वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही परिणामी छोटे-मोठे अपघात होत आहेत. गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने झुडपे तोडून मार्ग…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने मोफत धान्य वाटपास सुरुवात

गणेश चतुर्थीनिमित्त ना नफा ना तोटा तत्वावर धान्य वाटप *⚡मालवण ता.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्था मालवण, सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत ना नफा ना तोटा या तत्वावर गणेश चतुर्थीनिमित्त मोफत धान्य वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती स्नेहा केरकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी…

Read Full News

You cannot copy content of this page