सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने मोफत धान्य वाटपास सुरुवात

गणेश चतुर्थीनिमित्त ना नफा ना तोटा तत्वावर धान्य वाटप

*⚡मालवण ता.३०-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्था मालवण, सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत ना नफा ना तोटा या तत्वावर गणेश चतुर्थीनिमित्त मोफत धान्य वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती स्नेहा केरकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक विविध सेवा सहकारी संस्था मालवण सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत संस्थेच्या महिला सभासदांना यावर्षी कोरोनाच्या महामारी बरोबरच तौक्ते वादळ आणि पूरसदृश्य मुसळधार पावसाची अतिवृष्टी या सर्व नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा सामना करत त्रस्त झालेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा देण्याचे काम दरवर्षीप्रमाणेच यंदाही सलग दहाव्या वर्षी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत संस्थेच्या अध्यक्षा तसेच कार्यकारिणीने गणेश चतुर्थीनिमित्त कडधान्य ना नफा ना तोटा या तत्त्वावर गूळ, रवा, तेलपिशवी, चणा, पावटा, पांढरे वाटाणे, काळे वाटाणे, मूगदाळ, चणादाळ, चवळी प्रत्येकी एक किलो असे दहा नग माफक दराने वाटप सुरू केले आहे. हे वाटप आचरा, तोंडवळी तळाशील, सर्जेकोट, मिर्याबांदा कोळंब, मालवण, धुरीवाडा, मेढा, आवार दांडी, वायरी भूतनाथ, वायरी बांधवाडी, तारकर्ली, काळेथर, देवबाग या गावामध्ये २९ ऑगस्टपासून सुरू केलेले आहे, अशी केरकर यांनी दिली आहे

You cannot copy content of this page