मडुरा-सातोसे मार्गावरील झुडपे चतुर्थीपूर्वी हटवा

पिंट्या परब : अपघात घडूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

*⚡बांदा ता.३०-:* मडुरा पंचक्रोशीतील नागरिकांना गोव्यात जाण्यासाठी मडुरा-सातोसे-सातार्डा मार्ग सोयीचा असल्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली असून बऱ्याच दिवसांपासून ती तोडलेली नाहीत. यामुळे वाहनचालकांना वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नाही परिणामी छोटे-मोठे अपघात होत आहेत. गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने झुडपे तोडून मार्ग निर्धोक करण्याची मागणी युवासेना सातार्डा उपविभाग प्रमुख पिंट्या परब यांनी केली आहे. गोवा राज्यात कामासाठी जाणार वर्ग मडुरा पंचक्रोशीत मोठा आहे. मडुरा-सातोसे-सातार्डा मार्गे गोवा रस्ता जवळचा असल्याने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे अपघातांना आमंत्रण देत असून लहान मोठे अपघातही झाले आहेत. गणेशोत्सवात कोणताही अपघात घडण्यापूर्वी झुडपे तोडणे आवश्यक आहे. मडुरा रवळनाथ मंदिराजवळ तर रस्त्यावर मोठी झुडपे आली असून वळणावर समोरून येणारी गाडी दिसत नाही. गणेश चतुर्थी तोंडावर असून त्यापूर्वी झुडपे तोडून मार्ग निर्धोक करण्याची मागणी युवासेना सातार्डा उपविभाग प्रमुख पिंट्या परब यांनी केली आहे.

You cannot copy content of this page