दुरुस्ती गणेशोत्सव पूर्वी करा;सेनेचे उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी यांची मागणी
*⚡सावंतवाडी ता.३०-:* तालुक्यासह ग्रामीण भागात देखील वारंवार विज पुरवठा खंडित होत असल्याने त्या भागातील नागरिकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. काहीच दिवसांवर गणेशोत्सव आला असल्याने, तात्काळ विज वाहिन्यांची डागडुजी करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनी महावितरण अभियंता यांची भेट घेऊन केली आहे. यावेळी या मागणीकडे तात्काळ लक्ष न दिल्यास जनतेच्या आक्रोशास तोंड द्यावे लागेल असा इशारा दिला आहे.
