वेंगुर्लेत भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग : जन आशीर्वाद यात्रेदरम्यान बेकायदा जमाव करून घोषणाबाजी

*⚡वेंगुर्ले ता.३०-:* भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान वेंगुर्ले मध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३ (१) (३) अन्वये असलेल्या मनाई आदेशाचा आणि जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या कोरोना विषाणु साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना सूचना या दोन्हींचा भंग केल्या प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये भारतीय जनता पक्षाची जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आलेली होती. सदर यात्रा वेंगुर्ला पोलीस ठाणे हदीत 29 ऑगस्ट रोजी येणार असल्याने त्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदर जनअशीर्वाद यात्रा रविवारी शिरोडा, आरवली, वेंगुर्ला, मठ वेतोरा अशी काढून तसेच बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला, त्यामुळे भाजप वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, बाबली वायंगणकर, सोमनाथ टोमके, वसंत तांडेल, समिर कुडाळकर, मनोज ऊगवेकर, प्रितेश राऊळ, दिलीप उर्फ राजन गिरप, स्मिता दामले, दादा केळुसकर, लक्ष्मीकांत कर्पे वगैरे १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वेंगुर्ला शिवसेना कार्यालय येथे याच दिवशी शिवसेना पक्षाचे वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळु परब, शहर प्रमुख वेंगुर्ला अजित राऊळ, उपजिल्हा प्रमुख बाळा दळवी, सुनिल डुबळे, युवासेना तालुका अध्यक्ष पंकज शिरसाट, शहर समन्वयक विवेक आरोलकर, सचिन देसाई, सचिन वालावलकर, महिला तालुका संघटक सुकन्या नरसूले, काशिनाथ नार्वेकर, मनोहर येरम, मानसी हळदणकर, रश्मी डिचोलकर, नितिन मांजरेकर, सुनिल वालावलकर, दादा नारंग, मितेश राऊळ, मनिशा नेवाळकर तसेच इतर १० ते १५ शिवसेना कार्यकर्ते यांनी बेकायदा जमाव करून घोषणाबाजी केली. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page