*⚡कणकवली ता.३०-:* गोवा म्हापसा येथून ५ दिवसापूर्वी बेपत्ता झालेला रुदरेश पिळणकर( वय २४) यास खारेपाटण कोविड ड्युटी वरील असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.त्या युवकाला आई वडिलांच्या ताब्यात दिले.बेपत्ता मुलाचे आईवडिलांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.वाहतूक पोलीस प्रकाश गवस , खारेपाटण पोलीस उद्धव साबळे, सुयोग पोकळे यांच्या दक्षतेने ”तो ”युवक घरच्यांच्या ताब्यात देण्यात यश आले आहे. वाहन चालक योगेश अशोक हेरेकर (रा. पावशी ता.कुडाळ) याने खारेपाटण टाकेवाडी या ठिकाणी एक मुलगा रस्त्याच्या कडेला असल्याचे ड्युटीवरील पोलिसांना सांगितले. वाहतूक पोलीस अंमलदार प्रकाश गवस,उद्धव साबळे,सुयोग पोकळे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन जंगलमय भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून त्या नापता झालेल्या युवकास ताब्यात घेतले. आणि त्याच्या वडिलांना कळविले.तो नापता झालेबाबाबत म्हपसा पोलीस ठाण्यात नोंद आहे.सदर युवक बेपत्ता झालेबाबाबत म्हापसा पोलीस ठाण्यात ५ दिवसांपूर्वी नोंद करण्यात आली होती.रुदरेश पिळणकर याची वैद्यकीय तपासणी करून त्याला घरच्यांच्या ताब्यात दिले.
वाहतूक पोलीसांच्या सतर्कतेमुळे म्हापसा येथील तरुण अखेर कुटूंबीयांच्या ताब्यात
